कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत काल कांद्याला 5000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

काल राहाता बाजार समितीत कांद्याच्या 6441 गोण्यांची आवक झाली. कादा नंबर 1 ला 4100 ते 5000 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 2850 रुपये ते 4050 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1700 ते 2800 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 3200 ते 3800 रुपये भाव मिळाला. तर जोड कांद्याला 700 ते 1600 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment