मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर होणारी दगडफेक व जाळपोळ झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे (Beed) बीड मराठवाड्याकडे जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस रद्द करण्यात आले आहेत. अहमदनगर विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे; या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान बीड मराठवाडा या ठिकाणी मराठा समाजाचे आक्रमकपणे आंदोलन होत असताना गेल्या दोन दिवसांमध्ये काही बसेसची जाळपोळ करण्यात आली.
तर काही बसेसवर दगडफेक करण्यात आली. या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून बीड मराठवाडाकडे जाणाऱ्या सर्व बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक मुकुंद नरगाळे यांनी दिली आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यातून फक्त बीडकडे जाणाऱ्या बसेस (St Bus) पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. या संदर्भात अहमदनगरमधील प्रत्येक बस स्थानकावरून प्रवाशांना तशा सूचना देण्यात येत आहे.
