मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, ‘या’ आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्या जाळल्या

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक चिघळत चालले आहे. यात (Beed) मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यालयासह घरावर मराठा आंदोलक तरुणांनी तुफान दगडफेक केली.

तसेच घर आणि कार्यालयातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या देखील जाळल्या आहेत.

बीडच्या माजलगावमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. येथे आंदोलन सुरु असताना मराठा आंदोलक तरुणांनी आमदार प्रकाश साळुंके यांच्या घरावर दगडफेक केली.

दगडफेक केल्यानंतर आंदोलक तरुणांनी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये आणि घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या ५ चारचाकी गाड्या जाळून टाकल्या आहेत. त्याचबरोबर दुचाकी देखील जाळून टाकल्या आहेत. यामध्ये पोलिसांच्या दुचाकी देखील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान माजलगाव शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक तरुणांनी थेट आमदार प्रकाश साळुंके यांचे निवासस्थान टार्गेट केल्याने वातावरण चिघळलं आहे. यामध्ये प्रकाश सोळुंके यांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

तर कार्यालयासह घराची देखील मोठी तोडफोड झाली आहे. त्याचबरोबर सोळुंके यांच्या बंगल्याचा मोठं नुकसान यावेळी मराठा आंदोलकांनी केले. दरम्यान सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रकाश सोळुंके यांच्या घराच्या परिसरात पाहायला मिळत असून मराठा आंदोलक मात्र आक्रमक झाला आहे.

Leave a Comment