दिवाळीत ‘इतक्या’ दिवस बॅंका राहणार बंद

Bank holidays: आज पासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. जर तुम्ही पुढील सात दिवस जर बँकेशी संबंधित काही कामे करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. उद्या म्हणजेच १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत काही राज्यांमध्ये विविध कारणांमुळे एकूण ६ दिवस बँका बंद राहणार आहेत.

अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासणे गरजेचे आहे.

 

दिवाळीत या दिवशी राहणार आहेत बँका बंद

१० नोव्हेंबर: शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार मेघालयमध्ये या दिवशी वंगाळा महोत्सवामुळे बँका बंद राहणार आहेत. देशातील इतर राज्यातील कामावर कोणताही परिणाम होणार नाही. धनत्रयोदशी देखील १० नोव्हेंबरला आहे. मात्र, यानिमित्ताने इतर राज्यात बँकांना सुट्टी राहणार नाही.

११ नोव्हेंबर: शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार महिन्याचा दुसरा आणि चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. अशा परिस्थितीत ११ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत.

१२ नोव्हेंबर: १२ नोव्हेंबरला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. अशा परिस्थितीत देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहे. या दिवशी दिवाळीही साजरी केली जाणार आहे. रविवार असल्याने बँकांमध्ये दिवाळीची अतिरिक्त सुट्टी देण्यात येणार नाही.

१३ नोव्हेंबर: ही तारीख सोमवार आहे. या दिवशी गोवर्धन पूजा / लक्ष्मी पूजनामुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत त्यात त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, यूपी आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

१४ नोव्हेंबर: मंगळवारी १४ तारीख असून या दिवशी दिवाळी (बली प्रतिपदा)/विक्रम संवत नववर्ष/लक्ष्मीपूजनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत त्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि सिक्कीमचा समावेश आहे.

१५ नोव्हेंबर: बुधवारी १५ तारीख असून या दिवशी भाऊबीज, चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / निगल चक्कूबा / भ्रात्री द्वितीया हा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.

Leave a Comment