…तर लोकसभा लढविणार – आमदार निलेश लंके 

मी अजित दादाचा माणूस आहे. हे आता संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पक्षाने माझ्यावर विश्‍वास टाकून आदेश दिला तर एक लढवाया कार्यकर्ता म्हणून मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे.

पक्षाचा आदेश आला की एकाच मिनिटात तयार सुरू,असे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची मला माहीती नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली ऑफर देखील मला माहीत नाही.

मात्र माझ्याबद्दल लोकसभेची चर्चा ही तर होणारच. दक्षिणेतील तालुक्‍यात दौरे करतो म्हणजे मी लोकसभेची इच्छूक आहे असे नाही. संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते व मित्रमंडळ आहे. त्यांच्या सुख दुःखाला जावेच लागते.

तसेच विविध कार्यक्रम असतांना त्यांनाही उपस्थित रहावे लागते. दक्षिण लोकसभा संघात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मित्रमंडळ असल्याने पारनेर तालुक्‍यासह या तालुक्‍यात जाणे येणे होत आहे. लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत पूला खालून बरेच पाणी जाणार आहे.

Leave a Comment