कांद्याचे भाव कोसळले

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ११ दिवसाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या कांद्याच्या लिलावात कांद्याचे भाव हे 400 रुपयानी कोसळले असून त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दिवाळीच्या सुट्टीनंतर आज अकरा दिवसानंतर सुरू झाले जिल्ह्यातील लासलगाव मनमाड नांदगाव येवला पिंपळगाव बसवंत नाशिक सह इतर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले.

आज लिलाव सुरू झाल्यानंतर सकाळपासूनच कांद्याच्या भावांमध्ये तेजी नव्हती त्यामुळे शेतकरी नाराज होते. परंतु दुपारनंतर कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणावर कोसळले. 8 नोव्हेंबरला ज्यावेळी लिलाव बंद झाले, त्यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव हे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होते.

तर आज अकरा दिवसानंतर बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी भाव हा चार हजार रुपये मिळाला आहे. तर मनमाड बाजार समितीमध्ये ज्यावेळी लिलाव बंद झाले. त्यावेळी म्हणजे आठ नोव्हेंबरला कांद्याचे भाव हे 4500 असे होते.

तर ज्यावेळी कांद्याचे लिलाव म्हणजे आज सोमवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले. त्यावेळी बाजार समितीमध्ये भाव चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

या ठिकाणी देखील चारशे रुपयांनी भाव घसरले. जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leave a Comment