अहमदनगर : कावडीने पाणी नेण्यासाठी वैजापूर तालुक्यातून कायगाव टोका येथे आलेले चार तरुण गोदावरी(Godavari) नदीत बुडाले आहेत.
यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून इतरांसाठी शोधकार्य सुरूच आहे. त्यांचाही मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त होत आह
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील बाबासाहेब अशोक गोरे (वय ३५), नागेश दिलीप गोरे (वय २०), आकाश भागिनाथ गोरे (वय २०) व शंकर पारसनाथ घोडके (वय २२) हे तरुण शनिवारी दुपारी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ कायगाव येथे कावडीने पाणी आणण्यासाठी आले होते.
पाय घसरून पाण्यात पडल्याने आणि एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही बुडाल्याचे सांगण्यात येते. शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. इतरांचा शोध सुरूच आहे.
