कोकण पट्ट्यामधील हवामानबदलाचे परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र दिसून येतील. तर, 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी येथे सोसाट्याचे वारे आणि जोरदार पावसाशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील किनारपट्टी भागांमध्ये तयार होणाऱ्या वाऱ्यांची स्थिती आणि त्यांचे परिणाम म्हणून या हवामान बदलांवर सध्या आयएमडीसुद्धा लक्ष ठेवून आहे.
