पिवळ्या दातांना करा बायबाय… करा ‘हे’ सोपे उपाय 

दात आपल्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करतात. दात आपलं हसणं आणखी आकर्षक करतात, परंतु समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा तुमचे दात पिवळे असतात. पिवळ्या दातांमुळे तुम्ही कोणाच्याही समोर उघडपणे हसू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे दात पांढरे अगदी मोत्यासारखे चमकदार बनवू शकता.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. बऱ्याचवेळा तर दात घासल्यावरही पिवळे दिसतात, व हळूहळू हा पिवळसरपणा दातांना कायमचा पकडतो. दात पिवळे झाल्यामुळे अनेकजण इतरांसमोर हसणं तर सोडाच पण जास्त बोलतणही कमी करतात.

पण दातांचा पिवळसरपणा दूर करण्याचे विविध घरगुती उपाय असून, ज्यांच्या मदतीने दात चमकदार बनवता येतात. असाच एक उपाय आहे, जो केल्यानंतर तुमच्या दातावर जर पिवळा थर साचला असेल तर तो दूर होईल, शिवाय तुमचे दात चमकदार बनतील. चला तर, हा उपाय नेमका कोणता आहे, ते जाणून घेऊ.

 

कडूलिंब

दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे कडूलिंबाचा वापर. ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून ती तुमच्या दातांना चमकदार बनवू शकते. कारण यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी, अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. पांढरे चमकदार दात मिळवण्यासाठी कडूलिंब कसं उपयुक्त ठरू शकतं, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

कडूलिंबाच्या काड्या

दातांच्या आरोग्यासाठी भारतात वापरल्या जाणार्‍या सर्वांत जुन्या पद्धतींपैकी ही एक आहे. हिरड्यांचे आजार टाळण्यासाठी आणि दात पांढरे करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या काड्यांनी दात स्वच्छ करू शकता. ग्रामीण भागात या काड्या सहज उपलब्ध होतात. आता तर शहरांमध्ये मेडिकल स्टोअरमध्येही कडूलिंबाच्या काड्या सहज विकत मिळतात.

 

कडूलिंबाच्या पानांची पावडर

कडूलिंबाची पूड पारंपरिक पद्धतीने वाळलेली कडूलिंबाची पानं बारीक करून बनवली जाते. दात घासण्यासाठी कडूलिंबाची पेस्ट बनवण्यासाठी फक्त एक चमचा कडूलिंब पावडर, एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यामध्ये पाणी मिसळा. चमकदार आणि स्वच्छ दात मिळवण्यासाठी या घरगुती टूथपेस्टनं ब्रश करा.

 

कडूलिंबाच्या झाडाची पानं

कडूलिंबाची पानं तुमच्या हिरड्यांमधील प्लाक आणि टार्टर काढून टाकण्यासाठी कार्य करतात, जे दुर्गंधीचे मूळ कारण आहेत. कडुलिंबाच्या पानांची पावडर किंवा पेस्ट करून ती तुम्ही वापरू शकता.

 

कडुलिंबाची साल

निरोगी दातांसाठी तुम्ही कडूलिंबाची साल चावू शकता. दातांचा आजार दूर करण्यासोबतच दात चमकदार बनवण्यासाठीही हा एक चांगला उपाय आहे.

दरम्यान, दातांवरील डाग किंवा पिवळे दात तुमचे व्यक्तिमत्व खराब करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपाय करून दातावरील पिवळेपणा सहज दूर करू शकता.

Leave a Comment