शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत मोठा ट्वीस्ट, ठाकरे गटाचा….

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत यांनी मोठी मागणी केली आहे. 2018 ला निवडणूक आयोगाकडे सादर केलेली शिवसेनेचा घटना ग्राह्य धरली जावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोणती घटना ग्राह्य धरावी हा वाद जाणिवपूर्वक तयार करण्यात आला आहे. कारण हा पेच जून २०२२ पूर्वी निर्माण झाला नव्हता. त्यामुळे २०१८ चीच घटना ग्राह्य धरली जावी असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचा युक्तिवाद

ठाकरे गटाचे वकील कामत यांनी मोठी मागणी केली आहे. 2018 ला निवडणूक आयोगाकडे सादर केलेली शिवसेनेचा घटना ग्राह्य धरली जावी, असं त्यांनी म्हटलं आहे. कोणती घटना ग्राह्य धरावी हा वाद जाणिवपूर्वक तयार करण्यात आला आहे. कारण हा पेच जून २०२२ पूर्वी निर्माण झाला नव्हता. त्यामुळे २०१८ चीच घटना ग्राह्य धरली जावी असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

पुढे बोलताना कामत यांनी म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेचा विचार करून अध्यक्षांनी विभाजनापूर्वी पक्ष कोणाचा हे ठरवायचं आहे. पक्ष कोणाचा हे सिद्ध करण्यासाठी जबाबदारी आमची नाही आम्ही फक्त सहकार्य करत आहोत.

बाकी सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून आपली आहे. तुम्ही जर केवळ निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या घटनेवरून निर्णय घेणार असाल तर ती अवैध किंवा बेकदेशीर प्रक्रिया असेल असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान आता शिवसेनेची कोणती घटना मान्य करायची यावर अध्यक्ष राहूल नार्वेकर थोड्या वेळात निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2018 ची घटना मान्य करावी. ती सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उलट तपासणीसाठी बोलवावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तर मागणी मान्य केली तर निकाल द्यायला उशीर होईल. असं विधानसभा अध्यक्षांचं मत आहे.

Leave a Comment