अन् अजित पवारांनी प्रसारमाध्यमांची फिरकी घेतली

अजित पवार आज हिवाळी अधिवेशाआधी प्रसारमाध्यमांशी विधानसभेच्या इमारतीबाहेर बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार गट आणि शरद पवार गटाला विधानसभेच्या अधिवेशनासाठी एकच कार्यालय देण्यात आलं आहे.

याच पार्टी कार्यालयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी, “इतक्या छोट्या छोट्या प्रश्नांना महत्त्व देता आणि तेच चालवत बसता.

काल तर मी बघितलं कोणीतरी माझं पोट दाखवलं, जितेंद्रचं पोट दाखवलं. अरे त्याने काय होणारं आहे? कोणाची पोटं दाखवून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का?” असा प्रतिप्रश्न विचारला. अजित पवारांचा प्रतिक्रिया ऐकून त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही हसू आलं.

“महाराष्ट्रातील समस्या महत्त्वाच्या आहे. अवकाळी पाऊस पडतोय. पिकं उद्धवस्त होत आहेत. इथरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणासंदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणं. त्यामधून मार्ग काढण्याला महत्त्व देणं आवश्यक असल्याचं मला वाटतं,” असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Comment