बिग ब्रेकिंग! मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्रीपदासाठी…..

राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चर्चेत आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

अशातच आता आणखी एक नवा चेहरा मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी छगन भुजबळ भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची सर्वत्र चर्चा आहे.

इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला ओबीसी एल्गार मेळावा होत आहे.

एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ संबोधित करणार आहेत. इंदापुरात सभास्थळी मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

Leave a Comment