शेतकऱ्यांचा निळवंडेच्या पाण्यासाठी समृद्धीवर रास्ता रोको 

नाशिक(DSNews24) सिन्नर तालुक्याच्या (Sinnar) पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सायाळे शिवारात अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील (Nilwande Dam) पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना मिळावे या मागणीसाठी आंदोलन केले.

या आंदोलनात दीडशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती…

अहमदनगर जिल्ह्यातील देवकवठे, सिन्नर तालुक्यातील मलढोन, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते.

मात्र हे आवर्तन पाथरे वारेगावपर्यंत देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. दुसरीकडे सिन्नर तालुका यावर्षी दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे निळवंडेच्या पाण्यामुळे तरी किमान पूर्व भागातील जनावरांचा व काही अंशी शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Comment