अजित पवार गटातील इन्कमिंग अजूनही सुरुच आहे. सांगलीतील दोन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
तसंच येत्या महिन्याभरात अनेक नेते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
वैभव पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
