ब्रेकिंग! मुख्यमंत्र्यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा 

तेलंगणाचे(Telangana) नवे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ए रेवंत रेड्डी(Revanth Reddy) यांनी शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला. मी खासदारपद सोडले आहे, पण जनतेशी माझे नाते कायम राहील, अशी प्रतिक्रिया रेवंत रेड्डी यांनी यावेळी दिली.

रेवंत रेड्डी यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. मलकाजगिरीच्या लोकांचे माझ्या हृदयात स्थान आहे आणि राहील, असं देखील ते म्हणाले.

रेवंत रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त केला. दरम्यान या राजीनाम्याची आजपासून अंमलबजावणी करुन तो स्विकारण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

संसदेत ते ज्या ठिकाणी बसायचे त्या जागेचा फोटो देखील रेवंत रेड्डी यांनी शेअर केलाय. काँग्रेसने तेलंगणात विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर काँग्रेसचे नेते रेंवतं रेड्डी यांनी गुरुवार 7 डिसेंबर रोजी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

Leave a Comment