भाजपने सोपवली रऊफ शेख यांच्यावर मोठी जबाबदारी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील श्री.रऊफ शेख यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर सदस्य पदी निवड झाली आहे.या निवडी बद्दल राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी श्री.रऊफ शेख यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी भाजपा संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव लांडगे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अमोल खताळ,अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार, बाळासाहेब खेमनर, अॅड.अमित धुळगंड, सुभाष भुजबळ, ईसाक पटेल, बबलु काझी, नासिर पटेल, मुबीन मोमीन ई.कार्यकर्ते उपस्थित होते.

रऊफ शेख हे यापुर्वी राष्ट्रवादीत असताना त्यांनी पक्ष संघटनेत अल्पसंख्यांक सेल मध्ये तालुकाध्यक्ष,जिल्हा कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.तसेच मुस्लिम सेवा संघ या सामाजिक संघटनेत जिल्हाध्यक्ष व नंतर प्रदेश उपाध्यक्ष पदी त्यांनी काम करत असताना आपल्या कामाची चुणुक दाखवली आहे.

2019 साली विधानसभा निवडणुकीत मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वात शेकडो मुस्लिम कार्यकत्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला होता.विखे पा.यांचे विश्वासु कार्यकर्ते म्हणुन त्यांनी ओळख निर्माण केली आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचुन आणण्यात त्यांचे कौशल्य आहे.

ग्रामीण भागातुन असुनही राज्य स्तरापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे.रऊफ शेख यांचा जनसंपर्क ही मोठा आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी व राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment