मोठी बातमी! बसला भीषण आग, १३ जणांचा मृत्यू 

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या आगीत 13 जणांचा होरपळून झाला आहे.

या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुना-आरोन रोडवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली

Leave a Comment