शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्री झालेले आणि नंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच ताबा मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र व्हावे लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जातो आहे.
तर, शिंदेंच्या बाजूने हा निकाल लागले आणि ठाकरेंच्या आमदारांवरच अपात्रतेची तलवार कोसळेल असाही दावा दुसरा पक्ष करत आहे. या शक्य – अशक्यतेच्या हिंदोळ्यावर एक चर्चा अशीही आहे, की या प्रकरणातील लवाद असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.
नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 हे वर्ष निवडणुकांचे राहाणार आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय या महिन्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय येईल.
त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करणार की स्वतः राजीनामा देऊन संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरु होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून टाकणाऱ्या घटना घडमोडींचा, म्हणजेच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल या महिन्यात लागणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेलं अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर सप्टेंबरपासून नियमीत सुनवणी होऊन पूर्ण झालं आहे. आता कोणत्याही क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देऊ शकतील अशी शक्यता आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानतंर एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना सोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आणि निवडणूक आयोगात हा खटलाही जिंकला. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र व्हावे लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.
तर, शिंदेंच्या बाजूने हा निकाल लागले आणि ठाकरेंच्या आमदारांवरच अपात्रतेची कारवाई होईल, असा दावा शिंदेंच्या वकीलांनी केला आहे. या चर्चांच्या दरम्यानच या प्रकणाचे लवाद अर्थात कोर्ट असलेले राहुल नार्वेकर हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
