मंत्री विखे पाटील म्हणाले, संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये…..

अहमदनगर : शिर्डीमध्ये संजय राऊतांनी ( Sanjay Raut) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर निशाणा साधला होता. “विखे महसूल नव्हे आमसूल मंत्री” अशी टीका राऊतांनी केली होती.

आता संजय राऊतांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेय. संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज असल्याची बोचरी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शिर्डी येथे निशाणा साधला. महानंदा डेअरी ही महाराष्ट्राची आहे आणि ती इथेच राहिली पाहिजे असे सांगत लवासाबद्दल श्वेत पत्रिका काढायला सांगणारे राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे “महसूल मंत्री नसून आमसूल मंत्री” असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.

यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर देत संजय राऊत यांना टोला लगावलाय. संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. संजय राऊत यांनी किती लोकांच्या प्रपंचात हस्तक्षेप करून देशोधडीला लावले, ही यादी आता मी जाहीर करणार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय.

मी आत्तापर्यंत जाऊ द्या म्हणलो काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. मात्र आता वेळ आली आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.

Leave a Comment