राष्ट्रवादी लोकसभेच्या 14 जागांवर लढणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने 14 जागेवर दावा केल्याची माहिती समोर आलीये. तर रायगड लोकसभा उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचं देखील समजतंय.
त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही असताना मावळ जागेवरील हक्क सोडणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
तर रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
