नगर जिल्ह्यात चोरट्यांचा सशस्त्र दरोडा ; एकाचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे दिवटे वस्ती येथील कल्याण मच्छिंद्र गायकवाड (वय 42) यांच्या घरी सोमवारी (दि 13) रात्री अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यामध्ये कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती येथे कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये चोरट्यांनी घरामधील महिलांच्या गळ्यामधील सोन्याचा ऐवज हिसकावला व मारहाण केली.

तसेच घरातील रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच मृत पावलेल्या कल्याण गायकवाड यांनी अज्ञात चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी डोक्यामध्ये जबर मारहाण केल्यामुळे डोक्यातून रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब (ठसे तज्ञ) घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहेत.

Leave a Comment