आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

कर्क : हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे कामानिमित्त प्रवास होतील.

 

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

धनू : मन आनंदी व आशावादी राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Leave a Comment