अहमदनगर : शिवसेना उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हाताने शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
येथील नक्षत्र लॉन येथे रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा. संजय राऊत हे आले होते.
या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, स्व. आ. अनिल भैय्या राठोड आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले.
आणि भगवा पंचा परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगर दक्षिण संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर सौ. रोहिणी संजय शेंडगे, उप जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेना प्रदेश सह चिटणीस विक्रम राठोड, शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशोक पारधे, रुपेश गायकवाड, साजिद सय्यद, अमोल पाडळे, अन्सार शेख, पोपट रोकडे, राजू शिंदे, प्रकाश गाडे, सचिन साळवे, सागर रोकडे, सागर पारधे, संतोष साळवे, सोनू सय्यद आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
