संगमनेर(DSNews24) साकुर येथील रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट संचालित रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ आयोजित व्याख्यानमालेत १०० हुन अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला, अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा.रंजित गिरी यांनी दिली. त्यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.ही व्याख्यानमाला २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली.
या व्याख्यानमालेत कराटे प्रशिक्षण, महिला सबलीकरण,महिलांचे आरोग्य अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुस्कान पटेल यांनी ‘कराटे प्रशिक्षण काळाची गरज’ या विषयाबद्दल माहिती दिली.
यावेळी मुस्कान पटेल यांनी कराटे प्रात्यक्षिके करून दाखवताना नवनवीन टेक्निक्स विद्यार्थिनींना शिकविल्या. यामध्ये नेहमीच्या वापरातील वस्तू जसे की हेअर क्लिप, पेन, पर्स, सॅक याच्या मदतीने संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले. डॉ. वृषाली साबळे यांनी महिला सबलीकरण या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुलींनी स्वतःला ओळखलं पाहिजे व स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. मुलींनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः पुढे आले पाहिजे व आपल्या मधील व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व कौशल्य विकसित केले पाहिजे तरच आपले सन्मानाने या समाजात अस्तित्व निर्माण होईल. असे त्यांनी सांगितले. डॉ.सविता इघे यांनी स्त्रियांचे आरोग्यावर मार्गदर्शन करताना मुलींनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच, सकस आहार, सभोवतालची स्वच्छता, करमणुकीची साधने, व्यायाम व विश्रांती, अभ्यासातील ताणतणाव इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण केले. विद्यार्थिनींनी मैदानी खेळ खेळावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी विद्यार्थिनीनी स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे त्यासाठी निर्भय बनले पाहिजे त्याचबरोबर अर्थार्जन करून समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला पाहिजे त्यासाठी महाविद्यालयातील विविध उपक्रमात सहभागी घेऊन एक आपलं चांगलं व्यक्तिमत्त्व घडविणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करून व योग्य आहार घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनायला हवं असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या व्याख्यानमालेसाठी उपप्राचार्य आर. आर. गिरी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय आसवले,प्रा.म्हतु खेमनर प्रा. पोपट खेमनर, प्रा. प्राजक्ता बिडवे,प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.गणेश साळुंके, प्रा.योगेश साळुंके, प्रा.पुजा वलवे प्रा.शंकर राशिनकर ,प्रा.जया रक्टे , प्रा.लक्ष्मण कातोरे , प्रा.संदिप खेमनर, प्रा.शबाना शेख , प्रा.स्वाती ढोकरे , प्रा. स्वाती सागर, प्रा.हर्षदा हारदे, प्रा.शिरसाट श्री.मनोहर दुरगुडे, श्री. महेश पोखरकर श्री.पुंजाहरी वारे, श्री.लक्ष्मण जाधव, श्री.भाऊसाहेब बहिरट व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्रा.वृषाली शिरसाठ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती ढोकरे यांनी केले तर आभार प्रा.प्रियंका हाके यांनी मानले. .
