इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री म्हणाले…..

शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाला ५००० दिले तर धंदा मांडला टीका होते. मात्र, राजकीय सभांना पाच कोटींचा खर्च केला जातो, त्याचं काय? असा प्रश्न कीर्तनकार इंदुरीकरांनी उपस्थित केला होता.

यावर शंभूराज देसाईंनी भाष्य केलं. ‘हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन आणि होणारे राजकीय सभा हे दोन भिन्न विषय आहेत, या दोघांना वेगवेगळे नियम लावले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देसाईंनी दिली.

शंभूराज देसाई आज रविवारी सातारा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या जागावाटपावर मोठं भाष्य केलं. ‘महायुतीतील भाजपने ज्या जागा जाहीर केल्या आहेत.

त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांच्या वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झालेली आहे. त्यानंतर माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही. परंतु निश्चितच समन्वयाने आणि सन्मानपूर्वक लवकरच तोडगा निघेल’.

Leave a Comment