शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार? शिर्डीतून कुणाला संधी, ‘हे’ नाव समोर….

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. भाजप आणि कॉँग्रेसने काही उमेदवारांची नावं देखील जाहीर केली. यातच आता उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी आज जाहीर केली जाणार आहे.

ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या उमेदवारांच्या नावाची यादी देखील आज मंगळवारी जाहीर होणार आहे. महायुतीचे जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज अधिकृतपणे शिवसेना उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महायुतीत शिंदे गटाला १३ जागा मिळणार असून, भाजपला ३० तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यावर येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गटाकडून आज काही जागांवरील उमेदवार जाहीर केले जाणार आहे.

कोणाला मिळणार संधी?

कल्याण – डोंबिवली : श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई: राहुल शेवाळे, ठाणे : प्रताप सरनाईक, मावळ : श्रीरंग बारणे, कोल्हापूर : संजय मंडलिक, हातकणंगले : धैर्यशील माने, बुलढाणा : प्रतापराव जाधव, रामटेक : राजू पारवे,

वाशिम – यवतमाळ : संजय राठोड, शिर्डी : सदाशिव लोखंडे असे १० उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. शिंदे गटाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment