जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहेत.
यात 4 जणांचा समावेश आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. जळगावमधून करण पवार हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
यात सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. तर कोल्हापूरमध्ये कॉँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिल्याने त्यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. यापूर्वी ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली होती. ज्यात 17 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
