मेष : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
