भापजने त्यावेळेस जर अडीच-अडीच वर्षाचा करार मान्य केला असता, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. कारण आम्हाला कुणालाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
शिंदेंनी माझ्यावर आरोप करणे आश्चर्यकारक आहे. कारण शिंदे माझे मित्र आहे, त्यांचे आणि माझे फार जवळचे संबंध आहेत. जर भाजपने आमचा अडीच-अडीच वर्षांचा करार मान्य केला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसरं कुणीच झालं नसतं, कारण आम्हाला कुणालाच इच्छा नव्हती. विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला.
