महाविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला आहे.
भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलच उमेदवार असतील असं निश्चित आहे.
आता फक्त त्यांची उमेदवारी घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळाला असून तो आम्ही स्वीकारला आहे, अशी माहिती आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
