संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. चारचाकी वाहनात एक तरूण मृत अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आलीय. साकूरमधील गव्हाळीत एका झाडाखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात २८ वर्षीय तरूण मृत अवस्थेत पडून होता. मनोज गोविंद वाळूंज असं मयत तरूणाच नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. तसेच पंचनामा केला. सदर तरूण पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय. परंतु नेमका या तरूणाचा मृत्यू कसा झाला? याचीच चर्चा सुरू आहे. दरम्यान सदर घटनेचा तपास घारगाव पोलिस करत आहेत.
