पत्नीने पती आणि प्रियकराला शेतात बोलावलं अन् केलं भयानक कांड…

गव्हाची कापणी करण्याच्या बहाण्याने पत्नीने तिचा पती आणि प्रियकरालाही शेतात बोलावलं, यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आणि शेतातच प्रेमाचे रंग उधळले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनाही याचा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधावरून पती आणि पत्नी दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होता. या वादाला कंटाळून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं एका शेतात पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं, की शेतात ज्या ठिकाणी पत्नीनं पतीची हत्या केली, तिथंच तिनं प्रियकरासह प्रेमाचे रंग उधळले. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि मृत व्यक्तीची पत्नी या दोघांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

लोनार पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात छुटकुन्नू (रा. भदना, हरदोई) याचा मृतदेह 12 एप्रिल रोजी शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि कान, तसंच डोळ्यांजवळ पोलिसांना जखमा आढळल्या. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असतानास फॉरेन्सिक टीमकडून सगळे पुरावे गोळा केल्यानंतर काही आणखी पुरावे आणि संदर्भ पोलिसांच्या हाती लागले.

हरदोई जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक मार्तंड प्रकाश यांनी या प्रकरणाची अधिक माहिती देताना सांगितलं, की छुटकन्नू याच्या पत्नीचे मधुर पाल या नात्यातल्याच व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर छुटकन्नूच्या पत्नीने तिचे मधुर पाल याच्याशी दीर्घ काळापासून अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलं. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत, असंही तिनं स्पष्ट केलं. घटनेनंतर लगेचच काही गोष्टी घडल्या असल्याचंसुद्धा घटनास्थळी बारकाईनं तपास करताना पोलिसांना आढळलं आहे.

सततच्या वादांमुळं कंटाळलेल्या पत्नीनं आपल्या प्रियकराशी संगनमत करून पतीच्या हत्येचाच कट रचला. शेतातल्या गव्हाची कापणी करायचं असल्याचं सांगून ती पतीला शेतात घेऊन गेली. प्रियकर मधुर पाल आधीपासूनच शेतात लपून बसला होता. छुटकन्नू शेतात पोहोचताच मधुरनं त्याच्यावर हल्ला केला आणि तो गतप्राण होईपर्यंत त्याला मारहाण केली.

नंतर जवळच मधुर आणि त्याच्या प्रेयसीनं प्रेमाचे रंग उधळल्याचंही नंतर स्पष्ट झालं. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला अटक केली आहे आणि दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तसंच ज्या रॉडनं छुटकन्नू याला मारण्यात आलं, तो रॉडही ताब्यात घेण्यात आला आहे.

Leave a Comment