काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केली आहे. संपदा पतसंस्थेमुळे बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आलं आहे. बँकेच्या चेअरमन 134 कोटींचा घोटाळा केला तो आज जेलमध्ये सुद्धा आहेत. तुमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये जातात याचा विचार बाळासाहेबांनी करावा.
माझ्यावर आरोप करतात. त्यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार आहे. माफीयांना पाठीशी घालून आम्ही राजकारण करत नाही, असं म्हणत विखे पाटलांनी थोरातांवर घणाघात केलाय. ते लोणीत पत्रकारांशी बोलत होते.
