काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बडा नेता पक्ष सोडणार 

मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहे. माजी आमदार मुश्ताक अंतुले हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कोकणात त्यांचं मोठं वर्चस्व आहे. त्यांनीच आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

Leave a Comment