नगरमध्ये माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सोडले काँग्रेसचा एकही मोठा नेता दिसत नाही. थोरातांमुळेच नगर जिल्ह्यातील काँग्रेस हद्दपार झाल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पुर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते राजेंद्र वाघमारेंनी केला आहे. निवडून येणाच्या क्षमता असूनही थोरांतांनी माझे तिकीट कापल्याचा आरोपही वाघमारेंनी केला आहे. ते कोत्या मनाचे असल्यानेच काँग्रेसचे अनेक निष्ठावंत पक्षातून बाहेर पडले, याकडेही वाघमारेंनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, नगरमधील काँग्रेसच्या पडझडीला दिल्ली जाबाबदार नाही नगर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्यास जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व जबाबदार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे, मी आणि आमच्यासारखे निष्ठावंत बाहेर पडले आहेत. नगर जिल्ह्यातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचा गंभीर आरोप राजेंद्र वाघमारेंनी केला आहे.
