शिर्डीमधून दोन भाऊसाहेब वाकचौरे निवडणुकीच्या रिंगणात 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातही एकाच नावाचे दोन उमेदवार आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत.

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. परंतु वाकचौरे नावाचा दुसरा उमेदवारही अपक्ष म्हणून रिंगणात उतरविला आहे.

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे. तर भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही वाकचौरे हे अकोले तालुक्यातील आहेत. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

Leave a Comment