जावयाच सासू सोबत जुळल सूत, सासऱ्याने थेट…..

बिहार : सध्या लग्नानाचा सिझन सुरू आहे. सामान्यांपासून तर सेलेब्रिटींपर्यंत अनेकांच्या लग्नाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतात. पण सोशल मीडियावर अजब गजब लग्नाचा व्हिडिओ पाहायला मिळतोय. ज्यामधे जावयाने स्वताच्या सासूसोबतचं लग्नगाठ बांधल्याचं दिसत आहे. होय, हे घडलयं बिहारमध्ये. बांका जिल्ह्यातील एका व्यक्तिचं त्याच्याच सासूसोबत सूत जुळलं. ही बाब सासऱ्याला महित होताच सासऱ्याने मोठा गाजावाजा करत त्यांच लग्न लावून दिलं. सोशल मीडियावरही या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे.

 

नेमका प्रकार काय?

प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. प्रेमात वय,जात, धर्म कशाचही बंधन नसतं. प्रेमात पडेलेला माणूस त्याच्या पार्टनर शिवाय कुणाचाही विचार करत नाही. हे म्हणण्याचं कारण की, बिहारमधील बांक येथील छत्रपाल पंचायतीच्या हीरमोती गावातून हे प्रेम प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीचं त्याच्या सासूवरचं प्रेम जडलं. सासूही जावयाच्या प्रेमात तितकीचं वेडी झाली.

दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. पण हे प्रेम कुटुंबिय आणि समजापासून लपून राहू शकलं नाही. दोघांच्या प्रेमाबद्दल माहित होताच आणि दोघांना एकत्र रंगेहात पकल्यानंतर सासऱ्यानं दोघांचही लग्न लावून दिलं. 55 वर्षीय दिलीश्वर दर्वे असं सासऱ्यांच नाव असून 45 वर्षीय गीता देवी असं सासूच नाव आहे.

 

पतीनं करुन दिलं कोर्ट मॅरेज

दिलीश्वर यांच्या मुलीचा काही कारणामुळए मृत्यू झाला. त्यामुळए जावई सासरी राहायला आला पण सासरी राहताना त्याचा त्याच्याचं सासूवरच प्रेम जडलं. यावेळी सासू आणि जावई एकमेकांच्या पाहिल्यानंतर सासरऱ्याने त्यांची चौकशी केली असता त्यांचे अफेअर उघड झाले. सासऱ्याने याबाबत दिलीश्वर यांनी पंचायतीला माहिती दिली. जावई सिकंदर यादवनेही पंचायत आणि गावकऱ्यांसमोर उघडपणे सासूंवरील प्रेम व्यक्त केले. यानंतर दिलेश्वर आणि गावकऱ्यांच्या संमतीने सिकंदर आणि गीता देवी यांचा विवाह झाला.

Leave a Comment