एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ का? मोदींनी स्पष्ट सांगितले 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची तीन दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली.

त्यांनतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. एवढेच नाही तर या गटाचे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. फंडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी बसवणे ही भाजपाची रणनीती असल्याचं स्पष्ट झालं. या सर्व घडामोडीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक (१०५) जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे.

Leave a Comment