मेष : व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.
मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
कर्क : अपेक्षित सुसंधी लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
सिंह : हितशत्रूंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
कन्या : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तूळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कामे मार्गी लागतील.
धनू : आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.
मकर : अपेक्षित संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : तुमचा जनसंपर्क वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
