ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल राहणार की नाही? मोठी अपडेट समोर 

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्‍यमंत्री पदावरुन हटवण्‍यासंबंधीची याचिकेवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

केजरीवाल यांना दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल झाली होती.

आजच्‍या सुनावणीतन्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका फेटाळून लावणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालात न्यायालय हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही. सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते कांत भाटी हे उच्च न्यायालयासमोरील याचिकाकर्ते नसल्याचेही खंडपीठाने निदर्शनास आणून दिले.

Leave a Comment