राजगुरूनगर – लोकसभेच्या निवडणूक कामी केंद्रावर पोहोचल्यावर संतोष जोशी या शिक्षकाला हृदयाचा झटका आला होता. त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली.संतोष जोशी असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
खेड तालुक्यातील मोई विद्यालयातील शिक्षक संतोष गणपत जोशी या शिक्षक कर्मचार्यांची हडपसर येथील कोंढवा येथे निवडणूक कामे सर्व साहित्य घेऊन पोहोचल्यानंतर तिथे ते चक्कर येऊन पडले.
तेथे निवडणूक आयोगातील अधिका-यांनी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी क्वार्ड म्हणजे संत ज्ञानेश्वर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि. 15) रात्री साडेअकरा वाजता या शिक्षकाचे मृत्यू झाला.
