अहमदनगर ब्रेकिंग! कंटेनरच्या चाकाखाली सापडून माजी नगरसेवक ठार

राहुरी – शहरातील बसस्थानकासमोर नगर- मनमाड राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराणा हे जागेवर ठार झाल्याची घटना घडली.

माजी नगरसेवक तसेच व्यापारी कुंदनमल मानकचंद सुराणा (वय ७३, रा. गोकुळ काॅलनी, राहुरी) हे आज सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान शहरातून नगर- मनमाड रस्त्याने त्यांच्या घराकडे मोटरसायकलवर जात होते.

ते राहुरी बसस्थानकासमोर असताना अपघात होऊन एका कंटनेरच्या चाकाखाली ते सापडले. कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन कुंदनमल सुराणा यांचा मृतदेह रुग्णालयात नेला.

सुराणा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.

Leave a Comment