लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे काही तासात समोर येणार आहेत. तर चार जूनला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठा दावा केला आहे.
तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे.
मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
