आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असून आहे. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe) हे पिछाडीवर असल्याचे दिसून येते. मात्र हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे.
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत.
डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहे. आता अहमदनगरमध्ये नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
