महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा (Weather Update) फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
या अलर्टनुसार राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
