राज ठाकरेंनी ‘तो’ व्हिडीओ दाखवत केला खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले 

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्हिडीओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

मुंबईतील माहिमच्या (Mumbai Mahim) समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली.

त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे, अशी विचारणा एकाला केली. त्यानंतर त्याने ड्रोन फूटेज पाठवले. त्यात हे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले. हे अनधिकृत बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

माहिमच्या समुद्रामध्ये (Mahim) दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं आहे.

Leave a Comment