महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आलं. या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
महिलांसाठी देखील भरपूर घोषणा करण्यात आला आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पेट्रोल डिझेलचा आहे याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरचा VAT हा राज्यभरात समान करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरुन 25 टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेल एक दीड रुपयाने स्वस्त होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बजेटमध्ये केलेल्या घोषणेनुसार पेट्रोल डिझेलचे दर 65 पैशांनी स्वस्त होणार आहेत.
