मोठी बातमी! कॉंग्रेसच्या बड्या नेत्याच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कॉंग्रेसचे संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मपुरी श्रीनिवास यांचे आज शनिवारी पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

खासदार, मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा धर्मपुरी अरविंद हा सध्या निजामाबादचा खासदार आहे. त्यांचा मोठा मुलगा संजय यांनी यापूर्वी निजामाबादचे महापौरपद भूषवले आहे.

Leave a Comment