अहमदनगर : अकोले, संगमनेरसह ‘या’ तालुक्यात पावसाची हजेरी

अहमदनगर – रविवारी दिवसभर नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरासह परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे सायंकाळी आणि रात्री वातावरणातील गारवा वाढला होता. शेवगाव तालुक्यात दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील गदेवाडी, दहिगाव शे, रावताळे कुरुडगाव, घोटण, एरंडगाव धस, भागवत एरंडगाव, लाखे फळ आदी परिसरात दमदार पाऊस झाला आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात अधूनमधून पाऊस कोसळत होता. संगमेनरात दुपारी आणि सायंकाळी आषाढ सरी कोसळल्या. अकोलेच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.

नगर जिल्ह्यात रविवारपासून मंगळवारपर्यंत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, काल दिवसभर नगरशहरासह जिल्ह्यात दमट वातावरण होते. दुपारनंतर शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शेवगाव तालुक्यात मात्र दमदार पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस तालुक्यात पावसाने दडी मारली होती.

मात्र, शेवगाव तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे गदेवाडी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. रविवारी शेवगावचा आठवडे बाजार त्यात लग्नतिथी असल्याने बाजार करू व नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

Leave a Comment