दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षा 2024 या 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

या संबंधित वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. तसेच या परीक्षेचे वेळापत्रक कसे असणार आहे? हे जाणून घेऊयात.

दहावीच्या परीक्षा यंदाची वर्षी 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडल्या होत्या. या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. यानंतर आता या दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक समोर आले आहे. त्या वेळापत्रकानुसार या पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

 

दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक 

16 जुलै 2024 : मराठी

20 जुलै 2024 : हिंदी

22 जुलै 2024 : इंग्रजी

23 जुलै 2024 : गणित भाग 1

24 जुलै 2024 : गणित भाग 2

25 जुलै 2024 : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

26 जुलै 2024 : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

27 जुलै 2024 : सामाजिक विज्ञान भाग 1

29 जुलै 2024 : सामाजिक विज्ञान भाग 2

Leave a Comment